Published On : Thu, Nov 1st, 2018

79 व्या इंडियन रोड काँग्रेस(आयआरसी) राष्ट्रीय परिषदेच्या लोगोचे अनावरण

Advertisement

नागपूर: 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणारी 79 वी इंडियन रोड काँग्रेस(आयआरसी) ची राष्ट्रीय परिषद नागपुरात होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेच्या लोगोचे अनावरण समारंभ आणि आढावा बैठक गुरुवार, 1 नोव्हेंबरला मुख्य अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आयोजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, इंडियन रोड काँग्रेसच आयोजन सचिव (स्थानिक) आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिक्षक अभियंता रमेश होतवानी व प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे उपस्थित होते.

इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा होत आहे. या अधिवेशनाचे यजमानपद सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य भूषविणार आहे. या परिषदेला देशभरातील रस्ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील मंत्री यांचेसह जगभरातील प्रमुख देशांमधील रस्ते विकास क्षेत्रात कार्यरत मान्यवर या परिषदेला उपस्थिती दर्शविणार आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रस्ते सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता या परिषदेत स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांचा यांचेसह लोकसहभाग असावा, असा मानस उल्हास देबडवार यांनी व्यक्त केला त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात इंडियन रोड काँग्रेस-युथचे आयोजन व्हीएनआयटीच्या सहकार्याने करण्यात आले होते. शिवाय पहिला दोनशे विद्यार्थ्यांसाठी केवळ 10 टक्के शुल्कामध्ये आयआरसीचे सदस्य होण्याची संधीही मिळणार आहे. आयआरसी परिषदेच्या स्थळावर स्टॉलही उपलब्ध असून सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांना अत्यल्प दरात उपलब्ध असून बूकिंगसाठी 79ircnagpur.in या संकेतस्थळाला भेट द्या.

आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून त्यांचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते. उल्हास देबडवार आणि रमेश होतवानी यांनी विविध समितींच्या प्रमुखांकडून आढावा घेत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सर्व विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement