Published On : Wed, Jun 23rd, 2021

30 तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंन्द्र शटडाऊन आता 25 जून (शुक्रवार) ला

Advertisement

लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर आणि आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा ही बंद राहणार

२६ जून (शनिवारी) ला कमी दाबाचा पाणीपुरवठा… 

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर२३ जून२०२१ जून २४ ला सर्वत्र साजरा केल्या जाणार्या वट सावित्री ह्या सनानिमित्य    नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण  केंद्र  वरून शहराकडे येणाऱ्या  १३०० आणि ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील उद्भवलेल्या चार (४) गळत्याची दुरुस्ती तसेच  कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल आणि दुरुस्ती चे महत्वाची  कामे करण्यासाठी  घेतलेले 30 तासांचे शटडाऊन आता एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.  

 

Advertisement

नागपूर महानगरपालिका  ऑरेंज सिटी वॉटर यांनी हे ३० तासांचे शटडाऊन आता  २५ जून  (शुक्रवार)  सकाळी  १०  ते  २६   जून २०२१  (शनिवार))  दुपारी   दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.

 या दरम्यान या कामांमुळे लकडगंजसतरंजीपुरानेहरू नगरआशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा २५  जून (शुक्रवारी ) ला संपूर्णपणे बाधित राहणार आहे. तसेच शटडाऊन संपल्यावर २६ जून ला कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार आहे. शटडाऊन  कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

 या शटडाऊन काळात खालील कामे प्रस्तावित आहेत:

कन्हान-१३०० मुख्य जलवाहिनी: उप्पालवाडी बसथांब्याजवळ असलेले गळती दुरुस्ती

कन्हान -९०० मुख्य जलवाहिनी : कामठी ( GRC) जवळ गळती दुरुस्ती, वारेगाव (नवीन रस्ता) जवळ गळती दुरुस्ती, पिवळी नदी च्या मागे जलवाहिनीवर गळती दुरुस्ती.

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र: CC Tank चे देखभाल, दुरस्ती आणि गळती दुरुस्ती

 

या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

 

आशी नगर झोनबेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग       

 

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरू नगर झोननंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोनभांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान जवळपास लकडगंजसतरंजीपुरानेहरू नगरआशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका  ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

Advertisement
Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason Explained | Nagpur Today

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident #accident

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional #CentralJail

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV #newsupdate

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...

बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया खेल! #NagpurNews #crime #Fraud #bank #cctv

बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges