Published On : Sat, May 26th, 2018

…म्हणूनच बाळासाहेब ठाकरे मला ‘रोडकरी’ म्हणायचे : नितिन गडकरी

Advertisement

नवी दिल्ली: रस्ते तयार करण्याबाबतचा एवढा जोश कुठून येतो? हा प्रश्न केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान विचारले असता ते म्हणाले, मी इंजिनियर नाही, ना मी कुठल्या सिव्हीज इंजिनियरिंगचा विशेषज्ञ नाही. महाराष्ट्रात मंत्री असताना मला रस्ते निर्माणमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळेच शिवसेना नेता बाळासाहेब ठाकरे मला ‘रोडकरी’ म्हणायचे.

उल्लेखनीय आहे कि नितीन गडकरी 1065 ते 1999 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यादरम्यान त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे चे निर्माण 2 वर्षांत केले. मोदी सरकारने त्यांना रस्ते व परिवहन मंत्री का केले? या प्रश्नाच्या उत्तर गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला विचारले होते कि, कुठले मंत्रालय पाहिजे, यावर मी त्यांना रस्ते विकास आणि परिवहन मागितल्याचे ते म्हणाले. हे मंत्रालय 4-5 प्रमुख मंत्रालयात येत नाही. तरीसुद्धा मला याबाबत काहीही हरकत नसल्याचे गडकरी म्हणाले.

उल्लेखनीय आहे कि नितीन गडकरी यांनी 2017 मध्ये जलस्त्रोत मंत्रालयसुद्धा सांभाळले होते. रस्त्यांप्रती असलेली त्यांची आवड भाजपाला कसा फायदा पोहचवेल? याबाबत गडकरी म्हणाले कि भाजपाच्या कार्यकाळात दररोज 27 किलोमीटर रस्त्याचे निर्माण होत आहे. जर कुणाला विश्वास नसेल तर त्यांनी आरटीआय टाकून विचारू शकता. येत्या 27 मे रोजी पंतप्रधान मोदी पेरिफेरल एक्सप्रेस-वे चे उद्घाटन करत आहे. या रस्त्याचे निर्माण 500 दिवसांत करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे दिल्लीतील वाहनांवरील दबाव तसेच प्रदूषण कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Advertisement