Published On : Sat, Jan 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

‘ते लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला हाकोर्टाकडून जामीन मंजूर !

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर केला. या दोघांमधील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून त्यात प्रेमाची भावना दिसत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.

पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असली तरी तिने स्वतःहून तिच्या पालकांचे घर सोडले आहे. तिच्या पोलीस स्टेटमेंटमध्ये, मुलीने आरोपी व्यक्तीसोबत तिचे ‘प्रेमसंबंध’ असल्याची कबुलीही दिली होती.

कोर्टाने पुढे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की, ती अर्जदार (आरोपी) सोबत विविध ठिकाणी राहिली आणि तिला जबरदस्तीने नेण्यात आले अशी कोणतीही तक्रार तिने केलेली नाही. खंडपीठाने म्हटले की, प्रेमामुळेच ती अर्जदाराशी (आरोपी) जोडली गेली. त्यामुळे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार झाले असे म्हणता येणार नाही.अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.