Published On : Sat, Jul 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील ‘त्या’ नर्सिगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू निकृष्ट दर्जाची पाणीपुरी खाल्ल्याने !

Advertisement

नागपूर : जम्मू काश्मीर येथून नागपूरच्या मेडिकलमध्ये बी.एस्स्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आलेल्या शीतल राजकुमार (१८) या विद्यार्थिनीचा अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक निदान वैद्यकीय चाचणीत निकृष्ट पाणीपुरी खाल्ल्याने या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून या विद्यार्थिनीसोबत पाणीपुरी खालेल्या इतर दोन विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मेडिकलमध्ये बी.एस्स्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आलेल्या शीतल राजकुमार (१८) या विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणीने ३ जुलैला मेडिकल चौकात पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर दोघांना गॅस्ट्रोची लागण झाली. शीतलला डॉक्टरांनी दाखल होण्याचा सल्ला दिल्यावरही तिने नकार दिला. परंतु प्रकृती खालावल्यावर तिसऱ्या दिवशी ती रुग्णालयात दाखल झाली. परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मेडिकल प्रशासनाची खळबळ उडाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.