Published On : Fri, Jul 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारने आरटीई प्रवेशासंदर्भात घेतलेला ‘तो’ निर्णय घटनाबाह्य;उच्च न्यायालयाची टिप्पणी

Advertisement

मुंबई : राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीई प्रवेश प्रक्रियेतून वगळण्याबाबतचा अध्यादेश जारी केला होता.सरकारच्या या निर्णयाविरोधात पालकांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर आज सुनावणी झाली.

मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हणत सरकारला फटकारले. तसेच हा निर्णय अनुच्छेद २१ चे उल्लंघन करणारा असल्याचे म्हणत न्यायालयाने तो रद्द केला.

दरम्यान खासगी शाळांना दिलेल्या या सवलतीमुळे सर्वसमावेशक शिक्षणाच्या या कार्यक्रमातील खासगी शाळांचा सहभाग कमी होईल. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळांमधील उपलब्ध जागांच्या संख्येत मोठी घट होईल, असे पालकांनी याचिकेत म्हटले होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.