Published On : Fri, May 11th, 2018

तृतीय पंथीयांना १ टक्के आरक्षण द्या ; महापौर मीनाक्षी शिंदेची मागणी

ठाणे : तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

महापौरांच्या या मागणीचं तृतीयपंथीयांनी स्वागत केलं आहे. आजवर आम्हाला प्रत्येकानं निव्वळ वापरुन घेतलं, पण जवळ कुणीही केलं नाही. त्यामुळं महापौरांची ही मागणी आमच्यासाठी चांगली असल्याचं मत तृतीयपंथींनी व्यक्त केली.

अलीकडेच तृतीयपंथीयांना निवडणुकीत मतदान करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. पण तो देखील केवळ राजकीय फायद्यापोटीच असल्याचा तृतीयपंथीयांचा आरोप आहे. कारण मतदान करताना नागरिक असलेल्या या तृतीयपंथीयांना नागरिक म्हणून जगण्याचाही अधिकार असला, तरी उपजीविकेचं हक्काचं साधन मात्र उपलब्ध नाही.

तृतीयपंथीयांना शासकीय कोट्यात १ टक्का आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली, तर शासकीय कार्यालयं, आणि सर्वच सरकारी विभागात काम करण्याची संधी तृतीयपंथीयांना मिळू शकते.