Published On : Sat, Mar 23rd, 2024

उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात २० जागा लढणार;संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले २० उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. तरी काही उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे यांनी त्या-त्या जिल्ह्यांत संवाद मेळाव्याच्या निमित्ताने जाहीर केली होती.

महत्त्वाचे म्हणजे ज्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना मुंबईतून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना कल्याणमधून उमेदवारी दिली जाणार आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी पाच जागा शिवसेनेने लढवण्याचे निश्चित केले आहे. तर, ठाण्यात तीन जागांपैकी कल्याण आणि ठाणे या दोन जागा उद्धव ठाकरे गटाने लढवण्याचे निश्चित केले आहे. गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी देण्याचे ठाकरे गटाने ठरविले आहे.

‘ही’ आहेत संभाव्य उमेदवारांची नावे –
१. बुलढाणा नरेंद्र खेडकर
२. यवतमाळ-वाशिम संजय देशमुख
३. हिंगोली नागेश आष्टीकर
४. परभणी संजय जाधव
५. रायगड अनंत गीते
६. धाराशिव ओमराजे निंबाळकर
७ सांगली चंद्रहार पाटील
८ रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत
९ छ. संभाजीनगर अंबादास दानवे
१० मावळ संजोग वाघेरे
११. शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे
१२. नाशिक विजय करंजकर
१३. पालघर भारती कामडी
१४. कल्याण केदार दिघे
१५. ठाणे राजन विचारे
१६ . मुंबई उत्तर तेजस्वी घोसाळकर
१७. मुंबई उ. पश्चिम अमोल कीर्तिकर
१८ मुंबई उ. पूर्व संजय दीना पाटील
१९. मुंबई द.मध्य अनिल देसाई
२०. मुंबई दक्षिण अरविंद सावंत