नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने सर्व राजकीय नेते पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कामाला लागले आहे. ठाकरे गटाची महिला आघाडी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा आयोजित करण्यात आली. मंगळवार 16 जानेवारी रोजी विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यामध्ये विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. अमरावती, यवतमाळ वाशिम, रामटेक लोकसभा मतदारसंघात या महिला आघाडीकडून दौरा करण्यात येणार आहे.
दरम्यान राज्यात सध्या अंगणावाडी सेविकांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. तसेच महिला अत्याचारांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला आघाडीकडून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि इतर महिलांशी संवाद संबंधित विषयांवर भाष्य या संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून केले जणार आहे.