Published On : Sat, Mar 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

रशियात दहशतवादी हल्ला; बॉम्बस्फोटात ६० ठार तर १४५ जखमी

इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Advertisement

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी रात्री (२२ मार्च) दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला असून १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात असून या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे.

माहितीनुसार, मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली. स्फोटांचा आवाज झाला. यामध्ये ६० पेक्षा अधिक जण ठार झाले. हे हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या भीषण दहशतवादी हल्ल्याने मॉस्को शहर हादरले आहे. या हल्ल्यानंतर रशियन प्रशासन अलर्ट आले असून विमानतळ, रेल्वे स्थानके आणि विविध शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची भिती आहे. तर काही लोकांना रशियन जवानांकडून रेस्क्यू केले जात आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Advertisement