नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) कोळसा खाणीत झालेल्या भीषण अपघातात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कोळशाने भरलेल्या टब पालटल्याने हा अपघात घडला असून ही घटना रविवारी दुपारी घडली कुणाल ठाकरे,गजानन पेरकांडे आणि रोहित लोबडे असे जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचा इतिहास असलेल्या WCL खाणींमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत या अपघातामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
व्यवस्थापनाची कंत्राटदार प्रणाली आणि सुरक्षा प्रोटोकॉलची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर सुरक्षा अधिकारी आणि व्यवस्थापकांच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुधारित सुरक्षा उपायांची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





