Published On : Mon, Jul 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

हिंगणा परिसरात भीषण अपघात;ट्रक उलटून मजुराचा मृत्यू,चालकावर गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे.ट्रक उलटून मजुराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अनसिंह भिमसेन परते (३४, रा. खुकसर, जि. मंडला मध्यप्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तर लखन गौतम इंगळे (३३, रा. न्यु पुर्नवसन खापरी) व संतोष उद्धवराव डोंगरे (५०, रा. रोहिणी गृहनिर्माण सोसायटी, परसोडी, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत.

Gold Rate
29 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,39,100/-
Gold 22 KT ₹ 1,29,400 /-
Silver/Kg ₹ 2,49,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, अंकीत जेन (३४) यांच्या धानोली गुमगाव येथील फार्म हाऊसवर १९ जूनला दुपारी १२.३० वाजता अनसिंह मजुरी करीत होता. क्रॉंक्रीट मिक्सर मशीनच्या ट्रक चालकाने सुपरवायझरच्या सांगण्यावरून ट्रक रिर्व्हस घेतला असता तेथील जमीन दबल्याने मिक्सर मशीन ट्रक क्रमांक एम. एच. ३१, एफ. सी-५९०२ ट्रक खाली पलटला.

या अपघातात अनसिंह परते याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement