कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपुर द्वारे पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत टेकाडी गावात विविध कार्यक्रमाने विकास दिवस थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.१७) सप्टेंबर ला नेहरू युवा केंद्रा व्दारे ग्रा प टेकाडी (को.ख) अंतर्गत टेकाडी गावात सरपंचा सुनिता मेश्राम, ग्रा प सदस्या मायाताई मनगटे, आंगनवाडी सेविका शिलाताई गजभिये हयांच्या प्रमुख उपस्थित ग्रामस्थाना सरकारी योजने विषयी माहीती देण्यात आली. तसेच वृक्षरोपन करून विकास दिवस थाटात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी टेकाडी चे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन कार्य क्रमाचा लाभ घेतला. भारतीय आदिम जाती सेवक संघ संस्थेच्या जया हिवसे हयानी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन आकाश घोगरे यानी व्यकत केले. कार्यक्रमास सामाजिक संस्थेचे विशेष योगदान लाभले.