Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ च्या पथकाने खूनाचा प्रयत्न प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस ठाणे तहसील हद्दीतील गुन्हा क्रमांक 384/2025 अन्वये करण्यात आली आहे. संबंधित आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 109, 296, 351(3), 3(5) भा.न्या.स अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी :

प्रेम उर्फ खंड्या छोटूलाल कुंबरे (वय 20), रा. महादेव मंदिराजवळ, गुप्ता गॅरेज, पो.ठा. पाचपावली
सक्षम क्षीरसागर तांबे (वय 20), रा. बारसे नगर, पो.ठा. पाचपावली
जय दिलीप गांधी (वय 19), रा. महादेव मंदिराजवळ, पो.ठा. पाचपावली
गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, आरोपींची सिम्बा आयडी देखील अद्ययावत करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे तहसील करीत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.