Published On : Tue, Aug 21st, 2018

कर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विविध विकास कामांना गती मिळावी, यासाठी संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या उद्देशाने काम करा, असे निर्देश मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी कर निरिक्षक व कर संकलक यांना दिले.

समितीच्या वतीने कर आकारणी संदर्भातील आढावा घेण्यासाठी झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २१) हनुमाननगर, नेहरूनगर आणि गांधीबाग झोनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हनुमाननगर झोनमधील बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, हनुमाननगर झोनच्या सभापती रुपाली ठाकूर, नगरसेविका माधुरी प्रवीण ठाकरे, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नेहरूनगर झोनमध्ये सभापती रिता मुळे, प्रभारी सहायक आयुक्त सुभाष जयदेव तर गांधीबाग झोनमध्ये सभापती वंदना यंगटवार, सहायक अधीक्षक विश्वास धनकर यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरिक्षक व कर संकलक प्रामुख्याने उपस्थित होते.

कर विभागात मागील अनेक वर्षांपासून काम करूनही योग्य निकाल न देणाऱ्या निष्क्रीय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही सभापती श्री. जाधव यांनी यावेळी दिला. कर निरीक्षक व कर संकलक यांचे निष्क्रीय वर्तन व बेजाबदारपणा यामुळेही दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत आहे. त्यामुळेच महापालिकेकडून देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. कर निरिक्षक व कर संकलक यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यास मनपा तत्पर आहे. त्यामुळे कर निरिक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असेही ते म्हणाले.

कर निरीक्षक व कर संकलन यांनी आपल्या शैलीचा उपयोग करून नागरिकांशी योग्य समन्वय साधावा. आपल्या कुलश नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दीष्टपूर्ती होईल, याकडे लक्ष्य देण्याचेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.