Published On : Mon, Jan 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक- मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी

कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात चर्चा
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण व उपाययोजना तसेच मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात सोमवारी (ता. २० ) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शिंदे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने , डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे,डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. वर्षा देवस्थळे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात माहिती देण्यात आली. लसीकरणावर कसा भर देता येईल, जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण कसे करता येईल, गरोदर महिलांचे आरोग्य शिबीर राबविणे, स्वच्छता मोहीम राबविणे असे विविध मुद्दे यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.

बैठकीत सर्वप्रथम प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी गत महिन्यात लसीकरणापासून वंचित व उशिरा झालेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. बेघर निवारा केंद्रात देखील झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी भेट द्यावी. तिथे लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करावे. लसीकरणसपासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता एएनएम यांनी घरोघरी फिरणे, पुलाखाली, झोपडपट्टी किंवा ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या बालकांचे तसेच शाळेतील मुलांच्या लसीकरणावर भर द्यावा व लसीकरणाचा आढावा झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना द्यावा. तसेच बालसुधारगृह, जेल, रेड लाईट एरिया, अनाथआश्रम, मदरसे इतर धार्मिक स्थळे इथे देखील वेळोवेळी जाऊन बालकांचे लसीकरण करावे अशा सूचना प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी दिल्या.

Advertisement

लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांची एक यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात यावे. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरणासाठी आशा अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घ्यावे, आदी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद म्हणाले. यावेळी १०० दिवसीय कुष्ठरोग दुरीकरण मोहिमेविषयी देखील सूचना देण्यात आल्या.

‘हाय रिस्क एरिया’ मध्ये जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. मोबाईल व्हॅनने लसीकरणात गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची काळजी घ्यावी असे निर्देश झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आशा सेविकांना दिले. जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नियमित लसीकरणाचा आढावा सादर केला.

Advertisement
संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश बरकरार!

संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews  #nagpurnews #news

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews...

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV #TheftCase #PoliceAction

CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV...

नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student  #NewsUpdate #Investigation

नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student #NewsUpdate #Investigation

भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews

भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges