नागपूर: नागपूर शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि सरकारच्या विकास कार्याबद्दल समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी थेट चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरतर्फे आयोजित हा आगळावेगळा संवाद सोहळा गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, सिव्हिल लाईन्स येथील पाम रोडवरील ‘स्वागत लॉन’ येथे संपन्न होणार आहे.
व संपूर्ण संवाद कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शहरातली प्रमुख ५० चौकात स्क्रीन लावून नागरिकांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी होणारी थेट चर्चा.या संवादाला अधिक रंजक करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुप्रसिद्ध हास्य कलाकार भारत गणेशपुरे हे त्यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.
नागपूरच्या विकासाचे व्हिजन मांडतानाच, शहराची खास ओळख असलेल्या ‘तर्री-पोहा’चा आस्वाद घेत हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.भाजप नागपूर महानगरचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे व शहराच्या प्रगतीत आपले विचार मांडण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील प्रमुख ५० चौकात थेट प्रक्षेपणा साठी युवामोर्चा तर्फे नियोजन केले असून त्या साठी युवामोर्चा अध्यक्ष सचिन करारे महामंत्री रितेश पांडे,रिषभ अरखेल,नागेश साठवणे,कुलदीप माटे,युवती प्रमुख प्रशंसा भोयर व महिला मोर्चा च्या दिव्या धुरडे,विशाखा जोशी,मनीषा अतकरे,वंदना शर्मा व अनिता काशीकर यांनी नियोजन केले आहे. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि नेतृत्वाचा संवाद असा हा दुहेरी संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...





