नागपूर : समृध्दी महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. नुकतेच बुलढाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नागपूर ते पूणे रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून केली.
या भेटीत तडस यांनी समृध्दी महामार्गावर झालेल्या त्या भीषण अपघाताची सविस्तर माहिती वैष्णव यांना दिली. रेल्वे गाड्या कमी व प्रवासी भरपूर असे झाल्याने नागरिक वाहनाने पूणे गाठतात. ज्या गाड्या आहेत त्याचे आरक्षण मिळत नाही. म्हणून या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवावी, सुपरफास्ट गाड्यांचा वर्धा व बडनेरा येथे थांबा द्यावा, अशी मागणी तडस यांनी केली आहे.
वर्धा भुसावळ या पॅसेंजर या गाडीला एक्सप्रेस गाडीचा दर्जा देण्यात आल्याने ही गाडी आता कवठा, तळणी, दिपोरी, मालखेड, टिमटाला या स्थानकांवर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर अमरावती, नागपूर काजीपेठ, बल्लारशाह भुसावळ या पॅसेंजर गाड्या सर्व थांब्यांसह पूर्ववत सुरू करण्यात यावे, असेही तडस रेल्वेमंत्र्यांना म्हणाले. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याचे तडस म्हणाले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
भेदोड़कर सदर थाना सरकारी कार्यालय में लाखों की चोरी
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
एमपी बस स्टैंड पर खड़ी ट्रैवल्स बस में भीषण आग बड़ा हादसा...
सोमैया के दौरे पर महानगरपालिका में हंगामा...








