Published On : Wed, Mar 25th, 2020

सार्वजनिक कर्फ्यु व सामाजिक अंतर ची दक्षता घेत रक्तदान शिबीर संपन्न

कन्हान : – सध्या कोरोनाचा महामारीने संपूर्ण जग हलवुन गेलं आहे कित्तेक रोगी रुग्णालयात विविध आजारांना झुंज देत आहे. त्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर (दि.२५) मार्च ला मराठी नववर्ष (गुढी पाडवा) च्या शुभपर्वावर भूमिपुत्र बहुद्दे शीय संस्था आणि बजरंगी युवा प्रतिष्ठान मित्र परिवारच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, संताजी नगर, वार्ड क्र ५ कान्द्री येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

भूमिपुत्र बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अतुल हजारे व रोहित चकोले यांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करून शिबिरात एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे एका तरुण युवतीनेही रक्तदान केले.

आयोजकां द्वारे राज्य प्रशासनाने व सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत लागू केलेल्या सर्व अटी व दक्षतांचे पार दर्शी पालन करून रक्तदात्यांना एकएक म्हणून बोलवण्याच्या व्यवस्थेपासून ते मा.पंतप्रधानांनी काल केलेल्या सार्वज निक कर्फ्यु आणि सामाजिक अंतर या आव्हानांनाही समर्थन केले.

या संपूर्ण आयोजनात सौ.अरुणा हजारे, सौरभ पोटभरे, संकेत चकोले, उमेश लोणारे, लोकेश अंबाडकर, गणेश शर्मा, प्रफुल्ल हजारे, पंकज सिंह, सुरेंद्र चटप, निखिल हजारे, अजय राठोड, चिंतामण सार्वे, लाला नांदुरकर, अनिकेत साकोरे, रोशन नखाते, कैलास काकडे आदीने मौलाचे सहकार्य केले.