Published On : Sat, Jun 29th, 2019

दुहेरी हत्याकांडाच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

Advertisement

नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी पत्रकारांनी शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन केले. यानंतर पत्रकार संघर्ष कृती समितीच्यावतीने हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण यांना एक निवेदन दिले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये उषा कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची नात राशी कांबळे या आजी नातीची आरोपी गणेश शाहू, त्याची पत्नी गुड़िया शाहू तसेच अंकित आणि सिद्धू नामक साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात अपहरण करून हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टही या प्रकरणात लावण्यात आला होता.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त (एसीपी) किशोर सुपारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान सुपारे यांनी संशयास्पद भूमिका वठविल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जोरदार आरोप झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून चौकशीची सूत्रे काढून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ती एसीपी राजरत्न बन्सोड यांच्याकडे सोपविली होती.

या संबंधाने फिर्यादी रविकांत कांबळे यांनी एसीपी सुपारेविरुद्ध पोलीस आयुक्तांसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. सुपारे यांनी या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फायदा होईल, अशी भूमिका वठविल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली होती. मात्र, सुपारेंविरुद्ध कोणतीही कडक कारवाई झाली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी शुक्रवारी आंदोलन केले.

Advertisement

प्रकरण न्यायप्रविष्ट
सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम या प्रकरणाची बाजू मांडणार आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.