युवा मित्र समाजीक संघटनेचे तहसीदारांना निवेदन
कामठी :अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय आणि प्रतिबंधात्मक साहित्य आपत्ती काळात डांबून ठेवल्याप्रकर्णी आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथील जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांवर कारवाही करण्याचे तक्रारी निवेदन युवा मित्र सामाजिक संघटने कडून तहसीलदार आणि खंड विकास अधिकारी पारशिवणी यांचे सुपूर्द करण्यात आले आहे.प्रशासनाने लाखो रुपयांचे वैद्यकीय,कोव्हिडं प्रतिबंधात्मक साहित्य धूळ खात ठेवले होते गावात संसर्ग वाढून २४ मृत्यू झाल्यानंतर गावात टॅक्स भरणार्यालाच मास्क ही मोहीम प्रशासनाने सुरू केली होती.
गावात वाढता कोरोना संसर्ग बघता बाधित कुटूंबाणा मास्क, सेनेटायजर वाटप करण्याचे निवेदन सामाजिक संघटनेने दिले होते,टॅक्स भरणार्यालाच मास्क असा ठराव प्रशासनाने पारित केला होता,आरोग्य उपकेंद्रासाठी वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते,१४ वित्त आयोग योजने अंतर्गत ऑगस्ट २०२० मध्ये चौदा लाखांच्या जवळपास वैद्यकीय आणि कोव्हिडं प्रतिबंधात्मक साहित्य विकत घेतले होते.गावात कोरोना रुग्ण वाढून २४ मृत्यू झाल्यानंतर ही प्रतिबंधात्मक साहित्य वितरित न केल्या प्रकरनाचा विषय संघठनेने रेटून धरल्या नंतर टॅक्स त्यालाच मास्क या धर्तीवर प्रशासनाने मास्क वाटायला सुरवात केली मात्र सेनेटायजर त्यातून गायब केलें होते अश्यात प्रशासनाविरोधात सोमवारला संघटनेच्या वतीने तहसीदार वरून कुमार सहारे आणि खंड विकास अधिकारी खाडे यांचे कडे आपत्ती काळात अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य,मास्क,सेनेटायजर उपयोगात न आणता साठेबाजी करून लोकांचा जीव धोक्यात टाकल्या प्रकरणी संबधित अधिकारी,पदाधिकऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत तात्काळ चौकशी करून कारवाही करन्याची मागणी मनोज लेकुरवाळे,अमित वासाडे,सतीश घारड,योगेश सावरकर यांनी केलेली आहे.
“जो भरेल टॅक्स,त्यालाच मिळेल मास्क”या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाला प्रकरण अंगलट येण्याचे लक्षात येताच सरसकट मालमत्तेच्या प्रमाणावर दोन मास्क असा नवीन ठराव २९ एप्रिलच्या मासिक सभेत प्रशासनाने ठराव पारित करत सरपंच सुनीता मेश्राम यांनी काही सदस्यांना सोबत घेऊन गावात मास्क वाटायला सुरवात केली होती.ग्राम पंचायत सदस्य दिनेश चिमोटे यांनी मासिक सभेवर आक्षेप नोंदवत २९ एप्रिल रोजी बोलावलेली मासिक बैठक कोरम पूर्ण न केल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती ग्रामसचिव यांनी सभास्थान सोडले होते स्थगित बैठक ०३ मे रोजी होणार असल्याची माहितीही दिलेली होती.परंतु, त्याआधी, प्रति कुटुंब दोन मुखवटे वितरण सुरू झाले.मग तहकुब सभेत निर्णय कसा हा सवाल उपस्थित करत असल्याने प्रशासनापुढे पेंच निर्माण झालेला आहे,वरिष्ठ प्रकरणी काय कारवाही करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
२०२० मध्ये खरेदी केलेले कोविड प्रतिबंधात्मक साहित्य आणि वैद्यकीय साहित्य वितरण वेळेत होणे आवश्यक होते, संस्थेमार्फत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सोबत ज्यांची मास्क आणि सॅनिटायझर विकत घेण्याची आर्थिक स्थिती नाही आहे अश्यांना गावात कोव्हिडं संसर्ग वाढण्यागोदर प्रशासना द्वारे मास्क सॅनिटायझर वितरित केली जाऊ शकले असते,मात्र काही पदाधिकारी यांनि संघटनेच्या निवेदनाला राजकीय तोरा असल्याचे बिनबुडाचे आरोप
करत स्वतःची मनमानी करून तुगलकी ठराव घेतले आहे.दिलेल्या निवेदनावर सकारत्मक चौकशी होणे अपेक्षित.देशात साथीच्या रोगाचा प्रसार असून अश्या कठीण प्रसंगी कुठल्याही प्रशासनाकडून घेण्यात येणारे अशे निर्णय चुकीचे आणि समाजविरोधी आहेत.