Published On : Sat, Nov 25th, 2017

लॉन व हॉल मध्ये वाजण्या-या बेकायदेशीर DJ वर कार्यवाही करून अंकुश लावा

Advertisement


कन्हान : येथील कॉलरा सेलिब्रेशन लॉन मध्ये नेहमी बेकायदेशीर डि जे, सुगमसंगीत जोरजोरात होणार्‍या आवाजाचे ध्वनी प्रदुषण कायमस्वरूपी बंद करण्याकरिता लॉन मालकावर कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर ध्वनी प्रदुषणावर अंकुश लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र.३ च्या नागरिकाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी मा. ईश्वर कातकडे व थानेदार चंद्रकांत काळे यांच्याशी चर्चा करून व निवेदन देऊन केली.

मा. उच्च न्यायालयांचा आदेशाने डि जे वर बंदी घातली असून सुद्धा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग लगत विजय मॉर्केट कन्हान येथील नव्यानेच सुरू झालेल्या कॉलरा सेलिब्रेशन लॉन येथे नेहमी बेकायदेशीर डि जे, सुगमसंगीत जोरजोरात, मोठ्या आवाजात वाजवुन भरगच्छ लोक वसाहतीत बिनधास्त ध्वनी प्रदुषण सुरू आहे. या लॉन मध्ये नेहमी सायंकाळी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात डि जे चा आवाजाने भयंकर ध्वनी प्रदुषण होत असल्याने लॉन जवळपासच्या रहिवासी, विद्यार्थी, वयोवृद्ध व रूग्णांना असहनीय मानसिक व शारीरिक त्रास होतो. करिता लॉन मालक किंवा स्थायी कर्मचा-यास विचारणा केली तर लॉन मालक, कर्मचारी व कार्यक्रमातील वेगवेगळे नविन सदस्य बेजबाबदारीने स्थानिक रहिवाशांशी अश्लील शिवीगाळ, वादविवाद घालतात व जिवे मारण्याची धमकी देतात.यास्तव अश्या यांच्या बेजबाबदारीपणाने किंवा लॉनच्या ध्वनी प्रदुषणामुळे कुठलीही अप्रिय, अनुचित घटना घडल्यास सर्वस्वी जवाबदारी लॉन मालकाची राहिलं.

करिता लॉन मध्ये बेकायदेशीर डि जे वाजत असल्यास लॉन मालकावर कायदेशीर कारवाही करून लॉनच्या ध्वनी प्रदुषणावर अकुंश लावण्यात यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र. ३ च्या नागरिकाचे शिष्टमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी मा. ईश्वर कातकडे व कन्हान थानेदार चंद्रकांत काळे यांच्याशी भेदून चर्चा करून निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात कमलेश पांजरे, अशोक हिंगणकर, निखील साहारे, प्रतिक भोपळे, काशीनाथ माहुरकर, आंनद कळमकर, उपेंद्र शर्मा, गीता कळमकर,गिरजाबाई चंदेल, वैशाली आरभी, छाया सिंगेवार, सरोज कळमकर, विजय बिसने, कृष्णाजी भायदे, अरूण आरभी, अनिल सरीले, अरविंद नाईक, रेखा पिपरोदे, चंद्रकला मनघटे, वंदना शेंडे आदीने उपस्थित राहुन केली आहे.