Published On : Thu, Apr 27th, 2017

मनपातर्फे २९ एप्रिल रोजी ‘ स्वरधारा ’

Prabhakar Dhakade
नागपूर:
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर शनिवार दिनांक २८ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता सुप्रसिद्ध संगीतकार सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ‘ स्वरधारा ’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी मनपाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभदेखिल संपंन्न होईल. अध्यक्षस्थानी महापौर नंदाताई जिचकार राहतील. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष् संदीप जाधव, सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विरोधी पक्ष् नेते संजय महाकाळकर, बसपा नेते मोहम्मद जमाल, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर मनपाचे माजी आयुक्त व पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहतील.

Advertisement
Advertisement

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above