Published On : Mon, Mar 26th, 2018

स्वामीनारायण शाळा, वर्धमाननगर शाळेवर प्रशासक बसवा : ॲड धर्मपाल मेश्राम


नागपूर: स्वामीनारायण, वर्धमान नगर शाळेने आरटीई प्रवेशात घोळ निर्माण करून अनेक प्रवेशुच्छुक पालकांच्या पाल्यांना हेतुपुरस्सर प्रवेश नाकारला. शासकीय योजनेला हरताळ फासुन गोरगरीब पालकांचा भ्रमनिरास करणार्या ह्या शाळेवर प्रशासक बसवा, अशी मागणी मनपा विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम ह्यांनी शिक्षणाधिकारी श्री. लोखंडे ह्यांना आज येथे एका शिष्टमंडळाद्वारे आज येथे केली.

जिया सुनील बोरकर, स्वरा प्रवीण नागदेवे, देवांशु सुनील हारोडे व ईतर पाल्यांना गुगल मॅपचा दाखला देवून नियमबाह्य आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला. ४० उपलब्ध जागांपैकी २३ जागा शाळा व्यवस्थापनाने भरल्या. उर्वरित जागा भरण्यापासुन अशीच कारणे देवून गरीब पालकांना प्रवेश नाकारला.

ह्या शाळा व्यवस्थापनाची चौकशी करून शाळेवर प्रशासक बसविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली. शिष्टमंडळात प्रवेशुच्छुक पाल्यांचे पालक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement