Published On : Wed, Dec 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे धडक कारवाई

Advertisement

नागपूर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.20) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर झोन अंतर्गत क्रिडा चौक येथील Savera Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील देशराज तामगडे यांच्याविरुध्द तोडलेली झाडे आणि कचरा जवळच्या मोकळया जागेत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.