Published On : Wed, Sep 20th, 2017

हीराबाई शाळेत ” स्वच्छ भारत अभियान” कार्यक्रम सपन्न.

कन्हान : श्रीमती हीराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे ‘स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा ‘ अंतर्गत शाळेने स्वच्छता रैल्ली काढुन परिसरात विद्यार्थी व शिक्षकांनी झाड़ू घेऊन स्वच्छता करून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आला.

” स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा ” कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक मा.श्री नरेंद्रजी वाघमारे तर प्रमुख अतिथी न.प कन्हान स्वास्थ सभापती मा.गेंदलाल काठोेके, माजी नगराध्यक्ष अँड आशाताई पनीकर,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार उपस्थित होते. हिराबाई उच्च प्राथमिक शाळा ते वाघधरे वाडी पर्यत प्रभात फेरी काढुन स्वच्छता करण्यात आली. समारोपिय कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका वंदना रामापुरे मैडम यांनी प्रास्तविक केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत चांदेवार सर व आभार प्रदर्शन आयशा अन्सारी मँडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेचे विद्यार्थी समस्थ शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.