Published On : Thu, Mar 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ०१) ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानावर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करीत १ किलो प्लास्टिक जप्त केला आहे.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न.5, बिनाकी मंगळवारी येथील पवन स्वीट या दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत काटोल रोड चौक येथील रांगोळी एक्सिबिशन यांच्याविरुध्द परवानगीशिवाय बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत न्यू नंदनवन येथील श्रीराम प्लाझा यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकल्याबाबत कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर दिघोरी बेलदार नगर येथील प्रेमदास मुंगळे यांच्याविरुद्ध परिसरात अस्वच्छता पसरविल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.