Published On : Thu, Nov 17th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.16) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 11 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सोमलवाडा चौक येथील M/s Panino यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत कॅनल रोड येथील जनाब अस्लम खान यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत गोलीबार चौक, इतवारी येथील शर्मा स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत धंतोली येथील केतकी नर्सिंग होम यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत हॉस्पीटलचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच वसंत नगर, दिक्षाभूमी येथील शांती कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

धरमपेठ झोन अंतर्गत टिळक नगर, गोकुलपेठ येथील मान्सी गर्ल्स होस्टेल यांच्याविरुध्द रस्त्यालगत वस्तीगृहाचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत न्यू नरसाळा दिघोरी येथील Keshav Realators यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.