नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. 8) 21 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, आशीनगर आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 16 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 85,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 41 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत माटे चौक येथील अर्नव डिस्पोजल यांच्याविरूध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत रेशिमबाग चौक येथील जैन किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर टी-पाईंट येथील कल्पक इन्टरप्राईजेस आणि नयन ऑप्टीकल्स यांच्याविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत खरबी रोड, वाठोडा येथील श्री राम वस्त्रालय या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगापुतळा चौक येथील कश्मीरी स्टोअर्स, रामदेव पकोडा आणि प्रताप होम फर्निसिंग, दारसकर रोड, गांधीबाग येथील राम होम डेकोर या दुकानांविरुध्द कारवाई करून 20 हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत बिनाकी मंगलवारी येथील चांडक ॲन्ड सन्स, जैन मंदीर जवळ, तुलसीनगर येथील सुबोध बजाज यांच्याविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत जरिपटका रोड येथील जी.एच.किराणा ट्रेडर्स, भवानी किराणा ट्रेडर्स आणि मनोज किराणा ट्रेडर्स या दुकानांविरुध्द कारवाई करून 15 हजार रुपये दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मेन रोड, सदर येथील बब्बु प्लाझा यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच चौरसिया पान स्टॉल यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत मोरभवन सिताबर्डी येथील जनाब नौशाद अहमद यांच्याविरुध्द आजुबाजुचा परिसर अस्वच्छ व निकृष्ट केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच टिळक नगर, अमरावती रोड येथील 7 Bucks Coffee यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल आणि कचरा फी भरणा न केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ येथील श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा जाळुन प्रदुषण पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लकडगंज झोन अंतर्गत AVG Layout येथील Singh Timber यांच्याविरुध्द रस्त्यालगत लाकडी साहित्य डंपिंग करुन ठेवल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशिनगर झोन अंतर्गत पॉवरग्रीड चौक येथील तिवारी टयुशन क्लासेस यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विजेच्या खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
खालील प्लास्टिक वस्तुंवर बंदी
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.