Published On : Fri, Nov 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.11) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत दिनदयाल नगर, राधेमंगलम चौक येथील बॉम्बे चाट हाऊस यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मस्कासाथ, इतवारी येथील पटेल क्लॉथ या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रामकृष्ण नगर, नेल्को सोसायटी येथील स्नेह मिलन विकास संस्था यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत बजाज नगर चौक येथील ताज मटका रोटी यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत उमरेड रोड येथील V2 Bar & Restaurent हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत जेवण/अन्न वाया घालवतांना आढळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.