Published On : Thu, Feb 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई

Advertisement

नागपूर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.22) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत रेस्टॉरेंटचे टाकाऊ पदार्थ / जेवण जवळच्या मोकळया जागेत टाकले जात असल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोन अंतर्गत शिल्पा सोसायटी, मनीष नगर येथील श्याम सुंदर इस्टेट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.