Published On : Sat, Mar 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारी (ता.२५) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत सीताबर्डी मोदी गल्ली नं.०३ येथील हैरी मोबाईल या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील सिध्दी विनायक अर्पाटमेंट यांच्याविरूध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल टाकल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत डिप्टी सिग्नल येथील डी.पी. इसपाल यांच्याविरूध्द फुटपाथवर लोखंड ठेवल्यामुळे कारवाई करून ५ हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत हबीब नगर येथील स्टार बेकरी या दुकानावर बेकरीचा कचरा परिसरात टाकल्यामुळे कारवाई करून ५ हजार रूपयांचा दंड वसूल केला.

उपद्रव शोध पथकाने बुधवारी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.