नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.23) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ बस स्टॅण्ड जवळील भारत फरसान डेलि निड या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.8/9 भग्वाघर येथील रिध्दी-सिध्दी हाईटस यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत खरबी चौक येथील गोस्वामी डेअरी यांच्याविरुध्द डेअरीचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आशिनगर झोन अंतर्गत अटोमोटिव्ह चौक, कामटी रोड येथील Crown Car Décor या दुकानाविरुध्द रस्त्याच्या कडेला वाहने टाकून रस्ता गुंतविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत फ्रेन्ड कॉलनी, गिटटीखदान चौक येथील स्काय रॉयल सोलर इंडिया यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विद्युत खांबावर बोर्ड/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
छात्रों पर लाठीचार्ज के विरोध में जालना बंद #maharashtra #jalna #newsupdate #maharashtra...
शिरपुर में छात्रों का जोरदार विरोध प्रदर्शन #JantarMantar #Protest #CBIInquiry #MaharashtraNews
शेवगांव बंद को मिला व्यापक जनसमर्थन #maharashtranews #ahilyanagar #newsupdates #maharashtra
जंतर-मंतर लाठीचार्ज के विरोध में मुंबई में प्रदर्शन #VanchitBahujanAghadi #protest #JantarMantar
पेपर लीक पर फास्ट ट्रैक फैसला स्वागतयोग्य #Maharashtra #PoliticalNews #PaperLeak #FastTrackCourt
बीड में 'जूते मारो' आंदोलन से विरोध #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra #news





