Published On : Wed, Apr 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील राणा प्रताप नगरमधील मोकळ्या भूखंडात संशयित मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ!

Advertisement

Representational Pic

नागपूर : राणा प्रताप नगरमध्ये बुधवारी रात्री एका मोकळ्या भूखंडात संशयित मानवी सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा प्रताप नगर परिसरातील एका भूखंडात बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असताना काही कामगारांना मानवी सांगाडा सापडला. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. कामगारांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच तातडीने कारवाई करत राणा प्रताप नगर पोलिस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सांगाडा तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सांगाडा चार ते पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ते मानवी आहे की कृत्रिम आहे याची पुष्टी करता येत नाही. याबाबत प्रयोगशाळेच्या तपासणीनंतरच निष्कर्ष काढता येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.