Published On : Tue, May 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोठडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरण गाजतेय; निष्पक्ष CID चौकशीची मागणी

Advertisement

नागपूर : नरखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर अटकेत असलेल्या नाना सोनबरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जन बदलाव पार्टीने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष CID चौकशी करण्याची मागणी केली असून, उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

पक्षाच्या मते, अटकेनंतर पोलीस कोठडीत नाना सोनबरसे यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. तसेच नागपूर सेंट्रल जेलमधील परिस्थिती व काही कैद्यांच्या खुलाशांमुळे प्रकरण अधिक संशयास्पद बनले असल्याचे सांगण्यात आले.

कुटुंबीयांनी दाखल गुन्ह्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वैद्यकीय अहवालांच्या आधारे गंभीर शंका व्यक्त केली आहे. यामध्ये पोलीस व जेल प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या –
-पोस्टमार्टम अहवाल तात्काळ जाहीर करावा
-CCTV फुटेज सुरक्षित ठेवून सार्वजनिक करावे
-संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावेत
-दोषींवर कठोर कारवाई करावी
-स्वतंत्र CID चौकशी करावी

Advertisement

दरम्यान या प्रकरणात न्याय मिळाला नाही, तर लोकशाही व सामाजिक न्यायावर आघात होईल, असा इशारा देत पक्षाने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.