Published On : Fri, Aug 10th, 2018

सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फाेटकाचे साहित्य जप्त

Advertisement

मुंबई: दहशतवाद विरोधी पथकानं एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताे सनातनचा साधक असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं दहशतवादविरोधी पथकाच्या साहाय्यानं पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून आणि जवळच असलेल्या दुकानातून बाॅम्ब बनविणण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, सनातनच्या वकिलांनी हा आराेप फेटाळला आहे.

नालासोपा-यात काल रात्री दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दहशतवादीविरोधी पथकाच्या छाप्यात 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य सापडलं आहे. नालासोपा-यातील भांडार आळी भागात राहणा-या वैभव राऊत याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयितावर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची टीम पाळत ठेवून होती. अखेर त्याच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताे सनातन या संस्थेचा साधक असल्याचे समजते.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. सनातनला बदनाम करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव असल्याचे सांगत सनातन संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याचबराेबर वैभवची बाजुही त्यांनी मांडली. वैभवच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून वैभवला शक्य ती सर्व मदत करु, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.