नागपूर: उच्च शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि जगात वेगाने विकसित होणारे अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि श्रम करण्याची तयारी देशातील तरुणांनी ठेवावी, स्वयंरोजगाराची कास धरावी, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपुरचे आमदार डाॅ. मिलिंद माने यांनी दिला आहे. ‘नागपूर टूडे’ ला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिला.
डाॅ. माने म्हणाले की, उत्तर नागपूर भागातील वस्त्यांमध्ये मागील 5 वर्षांमध्ये मुख्यतः मजबूत रस्ते निर्मितीवर भर देण्यात आला. विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तर नागपूर भागात वाचनालयांना विकसित करण्यात आले आहे. तसेच आपण स्वतः डाॅक्टर असल्याने लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करून तो विधीमंडळातून पारित करून घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले.
Advertisement

Advertisement
Advertisement