Published On : Thu, May 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे राजकारण उघडं पाडले : उद्धव ठाकरे

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याच्या नव्हता, तर लोकशाही जिवंत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक होता. सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे राजकारण उघडं पाडले, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. ते आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाच्या निर्णयावर ताशेरे ओढले. या निकालामुळे राज्यपालांचे वस्त्रहरण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले पत्रकार परिषदेत म्हणाले .

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.