Published On : Wed, Jun 10th, 2020

लोखंड चोरीत अधीक्षकांचा सहभाग

Advertisement

अजनी रेल्वेतील चोरी प्रकरण
– आरपीएफच्या पथकाने सुरक्षा रक्षकालाही केली अटक

नागपूर: गलेलठ्ठ पगार असलेल्या रेल्वेच्या कार्यालय अधीक्षकांचा लोखंड चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. केवळ ५०० किलो लोखंड चोरी प्रकरणी आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाèयासह तिघांना अटक केली. या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना ३१ मे रोजीची आहे. या प्रकरणात खाजगी सुरक्षा रक्षकाचा सहभाग आहे.

राजकुमार निखारे असे या रेल्वे अधीक्षकाचे नाव आहे. तो अजनी येथे रेल्वे वाहतूक विभागात कार्यरत आहे. ३१ मे रोजी अजनी येथील डीटीआय कार्यालय परिसरातून लोखंडाची चोरी झाली. यानंतर गौसिया कॉलनी, दिघोरी येथील एका भंगार दुकानात त्या लोखंडाची विक्री केली. इकडे लोखंड चोरी झाल्याने आरपीएफ वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आरपीएफला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक होतीलाल मीणा, जी.एस. एडले, शिवराम सिंह, कॉन्स्टेबल लोकेश राऊत यांचे पथक गठीत करण्यात येऊन त्यांच्यावर तपासाची जबाबदारी देण्यात आली. या पथकाने दिघोरी भागात संबंधित भंगार खरेदी करणाèया दुकानाच शोध लावला व त्या दुकानाचा मालक प्रवीण गवरे याला ताब्यात घेतले.

प्रवीणचे प्रवीण अँड ब्रदर्स प्लास्टिक स्क्रॅप सप्लायर्स नावाचे दुकान आहे. चौकशीत सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, नंतर रेल्वेचे पाईप खरेदी केल्याचे कबुल केले. त्याच्या दुकानातील रेल्वेच्या मालकीचे असलेले लोखंडी पाईप जप्त करण्यात आले. हे लोखंड अजनी येथे रेल्वेत कार्यरत राजकुमार निखारे याच्याकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्या आधारे निखारे याला अटक करण्यात आली.

Advertisement

लोखंड चोरी झालेल्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक सुरेश पेठे (५०) कार्यरत होता. निखारेने पेठेच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबुल केले. त्यामुळे या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.