Published On : Sat, Sep 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

• राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्सची नियुक्ती • नागपूर लोकसभा प्रवासात पदाधिकाऱ्यांशी संवाद
Advertisement

भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील तेरा महिन्यात दररोज तीन तास काम करून भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,’ नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होतील, तर राज्यातही भाजपाच्या नेतृत्त्वात पुन्हा महायुतीचेच सरकार नवा इतिहास घडवेल.’

नागपूर लोकसभा प्रवासात शनिवारी त्यांनी सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स (प्रमुख पदाधिकारी) यांच्याशी संवाद साधला. शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात पूर्व व मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानंतर दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सायंकाळी त्यांनी जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्सशी चर्चा केली. या वेळी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील युवकांनी भाजपात प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भाजपाचे विभागीय संघटन सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आ. अनिल सोले, माजी आ. मिलिंद माने, भाजपा व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष विक्की कुकरेजा, भाजपा विधी आघाडी प्रदेश अध्यक्ष उदय डबले, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, माया इवनाते, मिलिंद कानडे, किशोर वानखेडे, विष्णू चांगदे, संदीप गवई, बाल्या बोरकर, श्रीकांत आगलावे, प्रमोद पेंडके, रामभाऊ आंबुलकर, किशोर वानखेडे, डिम्पी बजाज, विलास त्रिवेदी यांच्यासह सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख, समन्वयक, मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

• मतदारांना दीड कोटीपर्यंतचा लाभ
श्री बावनकुळे म्हणाले, पंचायत ते लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सुपर वॉरिअर्स ५१ टक्के मते मिळावित यासाठी नियोजन करतील. मोदी सरकारने प्रत्येक बुथवर विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना एक ते दीड कोटी रुपयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ दिला आहे. कोविड लसीकरण, आयुष्यमान भारत, मोफत अन्न योजना, किसान सन्मान निधी व आता विश्वकर्मा योजना अशा योजनांतून हा फायदा झाला आहे. चांद्रयान मोहीम व जी२० मुळे भारताचा जगभरात वाढलेला सन्मान हा भाजपा कार्यकर्त्यांची शिदोरी आहे, असेही ते म्हणाले.

• जनतेच्या मनात केवळ मोदीच
अहमदनगर येथे घरचलो अभियानात सामील झाल्यावर छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या प्रतिष्ठान मालकांशी संवाद साधला, त्यांना पुढचा पंतप्रधान कोण हा साधा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मोदी-मोदी हे नारे लावायला सुरुवात केली. जनतेला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावे, असे वाटते. त्यांना राहूल आठवत नाही, ना ममता आठविते. मात्र माझ्या या व्हिडीओचा अपप्रचार करण्यात आला, तसे काही नव्हते असेही ते म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.