Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सुनील केदार यांची कारागृहातून सुटका, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष !

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला. यांनतर आज दुपारी केदार यांची सुटका झाली. यादरम्यान त्यांच्या समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कारागृहाबाहेर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. इतकेच नाही तर त्यांच्या समर्थकानी घोषणा देत नागपूर मध्यवर्ती कारागृहापासून मिरवणूक काढली. त्यामुळे अजनी चौक ते राहाटे कॉलनी चौक वाहतूक बंद करण्यात आली होती.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात ट्रायल कोर्टने केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनील केदार यांनी यानंतर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र त्याठिकाणी त्यांचा जमीन नामंजूर करण्यात आला. त्यानंतर केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला.केदार यांना एक लाख रुपये मोबदल्यात हा जामीन मंजूर करण्यात आला. तसेच केदार यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement