Published On : Fri, Oct 22nd, 2021

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूकित मंत्री सुनील केदार गट सुद्धा सक्रिय

सावनेर: मागील काही वर्षांपासून युवक कॉंग्रेस मध्ये एक वेगळी चेतना निर्माण झाल्याने अनेक चेहरे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आलेले आहे.
पुढील महिन्यात जाहीर झालेल्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा गट सुद्धा सक्रिय झाला आहे. यावेळी मंत्री सुनील केदार यांचे तर्फे प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अनुराग भोयर हे युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाकरिता शर्यतीत राहतील. त्याचप्रमाणे प्रदेश महासचिव पदा करिता आताचे ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सीरिया त्याचप्रमाणे जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाकरिता अमोल केने यांच्या नावाची चर्चा आहे.
त्याचप्रमाणे मंत्री सुनील केदार यांनी नागपूर शहरात सुद्धा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपली ताकत दाखविण्या करिता मोर्चेबांधणी करीत आहे. त्यामुळे पूर्व नागपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या मागे मंत्री सुनील केदार हे भक्कमपणे उभे राहून नागपूर शहर अध्यक्ष पदा करिता अक्षय घाटोळे यांचे नाव समोर येत आहे.
मंत्री सुनील केदार अलीकडील काळात युवक काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमात उपस्थित राहून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना दिसून आले. त्यामुळे येत्या युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत सुनील केदार हे आपल्या गटाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील यात संशय नाही.
– दिनेश दमाहे,सावनेर