Published On : Sat, Feb 6th, 2021

शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांचे सुनील केदार यांचेकडून सांत्वन

नंदुरबार -राज्याचे दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष समितीच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला कार्यकर्त्या स्व.सीताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

स्व.सीताबाई शेतकरी आंदालानासाठी जात असताना जयपूर मुक्कामी प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.


आपण स्वत: शेतकरी कुटुंबातील शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणतो. स्व. सीताबाई यांच्यासारख्या शेतीवर निष्ठा ठेवणाऱ्यांमुळे शेतकरी उभा राहीला आहे. त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत. सीताबाई यांच्या कुटुंबियांना गोटफार्म देण्यात येईल असे श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या समवेत जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभपापती निर्मला राऊत, तहसीलदार ए.एम.शिंत्रे, पशुधन विकास अधिकारी डॉ.गणेश पालवे, जि.प.सदस्य प्रताप वसावे, सरपंच चंदूभाई तडवी उपस्थित होते.