Published On : Sat, Jan 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मिळाला मान!

Advertisement

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, सुनेत्रा पवार यांनी अखेर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व कोणाकडे जाणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. अखेर या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

आज मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीला पक्षातील सर्व आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार त्यांना देण्यासंदर्भात होता. दोन्ही प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

Advertisement

या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची सूत्रे आता सुनेत्रा पवार यांच्या हाती आल्याचं स्पष्ट झालं असून, राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.