Published On : Thu, Oct 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या; मोठा वाट पेटणार

Advertisement

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यातच आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आपले जीवन संपविले.

मराठा आरक्षणासाठी केलेल्या केलेल्या या आत्महत्येमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचा मृतदेह सायन रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.

सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.