Published On : Thu, Aug 23rd, 2018

उत्पादन शुल्क मंत्र्यांची उपायुक्तांच्या कार्यालयाला अचानक भेट

Advertisement

नागपूर: उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्तांच्या कार्यालयाला अचानक भेट दिली.

या बैठकीत ना. बावनकुळे यांनी या विभागात सुरु असलेल्या कामाची माहिती घेऊन तपासणी केली. याप्रसंगी उपायुक्त श्रीमती उषा वर्मा उपस्थित होत्या.

त्यांनी विभागाच्या कामाचे सर्व रेकॉर्ड दाखविले. जुलै व ऑगस्टमध्ये कोणती कामे सुरु आहेत, किती बैठकी झाल्या, दौर्‍यांबद्दल माहिती मंत्र्यांना दिली.

या दरम्यान बावनकुळे यांनी उपायुक्तांना विभागाचे दौरे घेऊन आढावा बैठकी घेण्याचे निर्देश दिले.

Advertisement

तसेच अवैध दारूसंबंधी कारवाई अधिक कडक करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक टेबलवर प्रलंबित असलेली प्रकरणे लवकर निकाली काढावी. आगाऊ दौरा दैनंदिनी तयार करून विभागीय स्तरावर दौरे करण्याचे निर्देशही यावेळी ना. बावनकुळे यांनी दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.