Published On : Thu, Jan 18th, 2018

सुदामनगरी ते मोरभवन बससेवेचा शुभारंभ


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाअंतर्गत सुदामनगरी ते मोरभवन बससेवेचा शुभारंभ गुरूवारी (ता.१८) सुदामनगरी स्थानकावरून करण्यात आला. नगरसेवक पिंटू झलके, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी यांनी यावेळी नव्याने सुरू झालेल्या बसला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी अजय बढारे, लिलाताई हाथीबेड, शुभांगी गायधने, नरेंद्र नांदूरकर, पुष्पा पांडे, भोलाभाऊ कुरडकर, योगेश मडावी, चंद्रकात आखतकर, योगेश मडावी, अजय हाथीबेड, परिवहन विभागाचे रामराव मातकर, सिद्धार्थ गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.

सुदामनगरी परिसरात बससेवा सुरू करण्यासाठी वारंवार मागणी होत होती. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे आणि नगरसेविका विद्या मडावी यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस नागरिकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याची ग्वाही नगरसेविका विद्या मडावी यांनी दिली. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.


ही बस सुदामनगरी मार्गे टेलिफोन नगर, पंचवटी, सक्करदरा चौक, मेडिकल चौक, मोक्षधाम चौक, मानस चौक, महाराजबाग चौक या मार्गे धावेल. या बसचे प्रवास भाडे पूर्ण तिकीट १९ रूपये तर अर्धे तिकीट १० रुपये असे राहील, अशी माहिती परिवहन विभागाद्वारे देण्यात आली आहे.