Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

८४ वर्ष जुन्या वृक्षाचे यशस्वी ट्रांसप्लांटेशन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मनपाचा अभिनव प्रयोग

Advertisement

नागपूर : पर्यावरण संरक्षणाच्या आणि हरित नागपूरच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेतर्फे एक उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आले आहे. मनपाने ८४ वर्ष जुन्या हेरिटेज झाडाचे ‘वृक्ष ट्रान्सप्लान्टर मशीनच्या’ सहाय्याने प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे प्रत्यारोपण सोमवारी (ता.९) करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या अभिनव प्रयोगाला मोठे महत्त्व आहे.

मनपाच्या उद्यान आणि वर्कशॉप विभागाने भांडेप्लॉट, येथील पिंपळाच्या वृक्ष या मशीनच्या सहाय्याने शीतला माता मंदिर जवळ, भविष्य निर्वाह निधी कार्यालय जवळ यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि उपायुक्त (उद्यान) श्री गणेश राठोड उपस्थित होते. या मशीनच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ४७ लक्ष रुपयांची तरतूद झाली आहे. मनपातर्फे खरेदी करण्यात आलेल्या या मशीनला प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन क्रमांक सुद्धा प्राप्त झाला आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भांडे प्लॉट चौक वर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे फ्लाय ओव्हर बांधण्यात येत आहे. या रस्त्यावर मुखर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ पिंपळाचा मोठा ८४ वर्ष जुना वृक्ष वाहतुकीसाठी अडथळा होता. या ३० फूट उंच झाडाला ‘वृक्ष ट्रान्सप्लान्टर मशीनच्या सहाय्याने जमिनीतून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. हे करताना झाडाच्या मुळांना आणि खोडाला नुकसान न करता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.

डकोटा कंपनीची ही मशीन महाराष्ट्रातील दुसरी मशीन आहे. ठाणे महानगरपालिकाकडे सुद्धा ही मशीन आहे. या मशीनचे काम रिमोटद्वारा केले जाते. अगोदर जे सी बी ने झाडाच्या जवळ मोठा खड्डा करण्यात आला. त्यानंतर या मशीनच्या सहाय्याने झाडाला उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. या मशीन मध्ये १६०० लिटर पाण्याची टाकी सुद्धा आहे. जे झाड काढतांना आणि लावतांना पाणी टाकून झाडाच्या मुळांना पाणी देत राहते. नागपूर मध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या झाडांना प्रत्यारोपण करण्यात या मशीनची मदत होऊ शकते. यावेळी नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुरमुळे, श्री. उज्ज्वल लांजेवार, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपागार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges