Published On : Tue, Sep 1st, 2020

अतिवृष्टी मुळे खचलेल्या विहीरींना अनुदान द्या- संदिप सरोदे

Advertisement

काटोल : नुकताच झालेली अतिवृष्टीमुळे काटोल नरखेड तालुक्यातील शेतातील विहीरी खचल्या असून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दीड लाख रुपये अनुदान देण्याची मागणी भाजपा किसान विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांनी केली आहे.

काटोल नरखेड तालुक्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोसंबी बागातील मोसंबी फळे झाडाखाली पडत आहे. तर दुसरीकडे कपाशी झाडे वाळत आहे. त्यातच या अतिवृष्टीत शेतातील विहिरी खचल्यामुळे विहिरीतील मोटार पंप सुद्धा त्यात अडकले आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थीक संकटासह मनःस्तापला सामोरे जावे लागत आहे. उत्तम उकंडे (कोल्हु), लक्ष्मण सलाम (खडकी), प्रेमराज सर्याम (भोरगड), सुमनबाई मुरोडीया (भोरगड), टिकाराम कुमेरीया (भोरगड) या गावात माजी सभापती संदीप सरोदे यांनी भेटी दिल्यात. त्यावेळी शेतकऱ्यांनी संदीप सरोदे यांच्याकडे खंत व्यक्त केली.

अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीमुळे शेतकऱ्यांना आधार म्हणून राज्य शासनानी खचलेल्या विहीरींना MREGS अंतर्गत दिड लक्ष रू अनुदान या योजनेतुन देऊन शेतकऱ्यांना लाभ

द्यावा. शासनानी याबाबतची तात्काळ दखल घेवुन ज्या शेतकऱ्यांच्या विहीर खचल्या असेल त्यांना या योजणे अंतर्गत निधी उपलब्द करून देण्यात यावा. अशी मागणी भाजपा किसान विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांनी केली. शिवाय काटोल नरखेड तालुक्यातील सोयाबीन पिकावर आलेल्या पिवळा मोझ्याक वायरस मुळे सोयाबीन पिके नस्ट झाली.

शिवाय अतिवृष्टी मुळे मोसंबी फळावर तसेच कपाशी पिकावर बुरशी, फंग्स, आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोसंबी ची फळे खाली पडत आहे तर दुसरी कडे कपाशी ची झाडे रोगामुळे पावसाळ्यातच वाळत आहे. त्यामुळे शासनाने मोसंबी उत्पादक शेतकरी, सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकशानीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई शाशनाने द्यावी असे ही संदीप सरोदे यांनी सॅप स्पस्ट केले.