
कन्हान: आज जाहीर झालेल्या माध्यमिक परीक्षेत पारशिवनी तालुक्यांतर्गत बी के सी पी शाळेचा सुबोध मेश्राम यांनी ९५.२०% गुण प्राप्त करून हा विद्यार्थी प्रथम तर निखिल खानवाणी ९४.८० % गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पारशिवनी तालुक्याचा निकाल ८६.५६ % टक्के लागला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्यातून १७७९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून १५४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८६. ५६ % आहे.
यात धर्मराज विद्यालय कन्हान – २०२ विद्यार्थी परिक्षेत बसले व १९० उर्तीण झाले असून निकाल ९४. ०५ टक्के, बळीराम दखने विद्यालय कन्हान १५८ पैकी १३७ उर्तीण-८६ , नुतन सरस्वती विद्यालय टेकाडी ७६ पैकी ७१उर्तीण- ९५. ९४ %, साईबाबा आश्रम शाळा टेकाडी ४३पैकी ४२ उर्तीण ९७. ६७ % , बिकेसीपी स्कूल कन्हान ९७ पैकी ९७ उर्तीण १०० % , यशवंत विद्यालय वराडा ४२पैकी ४१ उर्तीण ९७.६१ % , पंडित नेहरू विद्यालय कन्हान ६५ पैकी ४५ उर्तीण ६९.२३% , केसरीमल पालीवाल पारशिवनी २२७ पैकी १५७ उर्तीण ६९. १६ % , हरिहर विद्यालय पारशिवनी ८२ पैकी ६५ उर्तीण ८०.२४% , नवप्रतिभा हायस्कूल दहेगाव २९ पैकी २८ उर्तीण ९६. ५५% , राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी ६९ पैकी ६५ उर्तीण ९४. २०% , आदर्श हायस्कूल कन्हान ७० पैकी ४१ उर्तीण ६१. १९ % , लालबहादूर विद्यालय बाभूळवाडा ९० पैकी ८८ उर्तीण ९७. ७७, राष्ट्रीय आदर्श विद्यालय तामसवाडी ४५पैकी ३९ उर्तीण ८६. ६६% , विद्यामंदिर कामठी काॅलरी २८ पैकी २८ उर्तीण १००% , अखिलेश हायस्कूल साटक ४७ पैकी ४१उर्तीण ८७. २३% , राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी २७पैकी २०उर्तीण ७४. ०७%, अखिलेश हायस्कूल माहुली ४७पैकी ४२उर्तीण ९५. ०५% , नारायण विद्यालय इंग्रजी माध्यम कन्हान ८७पैकी ८७उर्तीण १००%, नारायण विद्यालय हिंदी माध्यम कन्हान ७६पैकी ६३उर्तीण ८२. ८९% , साईनाथ विद्यालय बोरडा ४२पैकी ४०उर्तीण ९५. २३%, चक्रधर विद्यालय डोरली २७पैकी २०उर्तीण७४. १९ , तथागत हायस्कूल करंभाड ६२पैकी ५८ उर्तीण ९३. ५४%, शासकीय आश्रमशाळा कोलीतमारा २२पैकी २१उर्कीण ९५. २३%, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टेकाडी (को. ख) १९पैकी १२उर्तीण ६३. १५% व ग्रामीण विकास विद्यालय सालवा तालुका मौदा -१३२पैकी ११३उर्तीण ८५. ६० टक्के निकाल घोषित झाला.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खंडविकास अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप बमनोटे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे, धर्मराज विद्यालयाचे मु़ख्याध्यापक चंद्रशेखर झोड, कन्हान पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे,शिक्षक मैत्री मंच शाखा पारशिवनी चे जयकुमार बनसोड , प्रकाश रंगारी यांनी गु़णवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .








